प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 

भारतात आजपर्यंत अनेक उत्कृष्ट दिग्दर्शक होऊन गेले. त्यापैकीच एक अग्रगण्य नाव म्हणजे जे ओम प्रकाश. आज वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. जे ओम प्रकाश हृतिक रोशनचे आजोबा तर राकेश रोशनचे सासरे आहेत. जे ओम प्रकाश यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर कलाकारांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूतीची भावना व्यक्त केली आहे.
  

 

आपल्या कारकिर्दीत त्यांनी आप की कसम (१९७४), आखिर क्यों ?  (१९८५), अर्पण (१९८३), अपना बना लो (१९८२), आशा (१९८०), अपनापन (१९७७) असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. विशेष म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आप की कसम' या चित्रपटातून राजेश खन्नाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या 'आदमी खिलोना है' या चित्रपटात त्यांनी जितेंद्रबरोबर कामदेखील केले.

दिग्दर्शनाबरोबरच आया सावन झूम के (१९६९), आयी मिलन की बेला (१९६४), आए दिन बहार के (१९६६), आँखों आँखों में (१९७२) यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. १९९५ ते १९९६ असे एक वर्ष त्यांनी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले.

इतक्या महान चित्रपटकर्त्याला आज आपण गमावले असल्याने चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली असून कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे.

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@