२६/११ मास्टरमाईंड हाफिज सईद दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : लष्कर-ए-तोएबा म्होरक्या आणि मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानच्या गुजरांवाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला १७ जुलैला अटक केली होती.

 

हाफिजच्या संघटनेने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासह भारतात वेगवेगळया ठिकाणी दहशतवादी कारवाया केल्या होत्या. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने हाफिज विरोधात २३पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हाफिजसोबत त्याच्या काही साथीदारांनीही अटक करण्यात आली आहे. हाफिज सईदशी संबंधित प्रकरणाची यापुढे पाकिस्तानातील गुजरातमधील न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी लाहोर न्यायालयात सुनावणी सुरु होती.

@@AUTHORINFO_V1@@