कलम ३७० वरून काका-पुतण्यात जुंपली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : केंद्र सरकारने काश्मीरसंबंधित कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर अनेक विरोधकांनी सरकारला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र कलम ३७० वरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्याचे दिसून येत आहे. कलम ३७० वर निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली होती. सरकारच्या या निर्णयावर त्यांनी टीकाही केली. तर पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारच्या निर्णयावर आज लोकसभेत टीका केली.  दुसरीकडे पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

 

कलम ३७० रद्द करण्याच्या विधेयकावर शरद पवार सरकार टीका करताना म्हणाले की, "जम्मू-काश्मीरबाबत महत्त्वाचा निर्णय घेताना तेथील जनतेला व नेत्यांना विश्वासात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असता तर अधिक चांगले झाले असते." तर राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रे’ च्या शुभारंभ कार्यक्रमात अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. 'सरकारचा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याला आमचा विरोध नाही. आम्ही विरोधाला विरोध करत नसल्याचे अजित पवार म्हणाले. एवढंच नाही तर सरकारने आता पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पवार घराण्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@