पाकिस्तानात झळकली 'अखंड भारत'ची पोस्टर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये 'अखंड भारत' ची पोस्टर्स झळकली आहेत. इस्लामाबादमधील रहिवासी असलेला साजिद या व्यक्तीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून 'अखंड भारत' ची पोस्टर इस्लामाबादच्या रस्त्यांवर झळकवल्याचा दावा त्याने केला आहे. 'महा भारताच्या दिशेने एक पाऊल' अशा आशयाचे हे पोस्टर असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचे राज्यसभेतील भाषणातील 'अखंड भारत'चे ट्विट छापण्यात आले आहे. तसेच अखंड भारताची प्रतिमा छापण्यात आली आहे.


"आज जम्मू-काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान घेऊ, पाकव्याप्त काश्मीर घेऊ आणि देशाचे अखंड भारताचे जे स्वप्न आहे, ते या देशाचे सरकार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच पूर्ण करतील," असे संजय राऊत सोमवारी राज्यसभेत बोलले होते. राऊत यांची ही प्रतिक्रिया एका वृत्तसंस्थेने ट्विट केली होती. तेच ट्विट अखंड भारताच्या या पोस्टरवर छापण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून पाकिस्तानसाठी यापेक्षा लाजिरवाणी परिस्थिती काय असू शकते, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमातून येत आहेत. दरम्यान, यानंतर दुसरा एका व्हिडीओ समोर आला असून यात पाकिस्तानमधील पोलीस रस्त्यांवरील अखंड भारताची पोस्टर्स उतरवताना दिसत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@