काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा; काँग्रेसचे राष्ट्रघातकी विधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणारे विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. यानंतर काँग्रेसने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. "जम्मू-काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असताना तो आपण देशांतर्गत मुद्दा कसा काय बनविला ?" अशी राष्ट्रघातकी भूमिका काँग्रेसने मांडली. लोकसभेतील काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी ही भूमिका मांडली.

 
 

'भारत-पाकिस्तानमध्ये अनेक द्विपक्षीय करार झाले आहेत. "कलम ३७० ही अंतर्गत ही बाब असल्याचे तुम्ही म्हणता, पण १४४८ पासून हा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघात आहे. मग जम्मू-काश्मीरबाबतचाच मुद्दा हा अंतर्गत बाब कसा काय झाला ? सरकार याबाबत निर्णय कसा काय घेऊ शकते ?", अशी भूमिका चौधरी यांनी मांडली. यानंतर शाह यांनी आक्रमक होत काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असताना त्याबाबतचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात चालावा का ? याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@