पाकव्याप्त काश्मीर आणि अकसाई चीन भारताचाच - अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |



 


नवी दिल्ली : मी ज्यावेळी जम्मू-काश्मीर असे म्हणतो, त्यावेळी यात पाकव्याप्त काश्मीर आणि अकसाई चीनचाही  समावेश होत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस व विरोधकांना ठणकावून सांगितले. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणारे विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर आज शाह यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. यावेळी विरोधकांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते विरोधकांना उद्देशून बोलत होते.

 

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जम्मू-काश्मीरविषयीची सुनावणी संयुक्त राष्ट्र संघात सुरू असताना सरकार याबाबत निर्णय कसा घेऊ शकते ? अशी भूमिका घेतली. यानंतर शाह यांनी आक्रमक भूमिका घेत जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढण्यास कोणीही रोखू शकत नसल्याचे दरडावून सांगितले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून यावर निर्णय घेण्यासाठी संसद हेच सर्वोच्च ठिकाण असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

 

जम्मू-काश्मीरसाठी प्राणाची आहुती देण्यास तयार

 

वेळ आली तर जम्मू-काश्मीरसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची सिंहगर्जना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत केली. कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम असलेले शाह यांनी विरोधकांना खडेबोल सुनावत जम्मू-काश्मीरसाठी आणि पाकव्याप्त काश्मीरसाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्याची गर्जना केली.

@@AUTHORINFO_V1@@