सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी आपले लक आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. '
RX100' नावाच्या तामिळमधील हिंदी रिमेकमध्ये तो झळकणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. सध्या रिमेकची चलती असताना या चित्रपटाविषयीदेखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

आहान शेट्टीबरोबर 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' मधून नुकतेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या तारा सुतारियाचीदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे. हा चित्रपट मिलन लुथारिया दिग्दर्शित करत असून साजिद नाडियादवाला चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

आपल्या वडिलांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रियतेनंतर आणि यशानंतर आहानच्या चित्रपटामधील कामाकडे प्रेक्षकांचे लक्ष असेल. त्याचबरोबर तारा सुतारिया आणि आहान दोघेही चित्रपटसृष्टीत नवखे असल्यामुळे आपल्या अभिनयाची छाप पाडण्यात ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@