
सुजिथ दिग्दर्शित 'साहो' चित्रपटाविषयी सध्या चित्रपट क्षेत्रात चर्चा सुरू आहे. दरम्यान, सध्या चित्रपटांमध्ये असलेली स्पर्धा लक्षात घेता चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्टऐवजी ३० ऑगस्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा ऍक्शन थ्रिलर चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित करण्याची चित्रपटकर्त्यांनी इच्छा होती. या इच्छेचा मान ठेऊन अनेक चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. यासाठी 'साहो' च्या टीमने सर्व चित्रपटकर्त्यांचे आभार मानणारे एक पत्र आज प्रकाशित केले.
Extremely thankful for producers across all the languages for clearing the way for #Saaho and helping for a bigger release.
— UV Creations (@UV_Creations) August 6, 2019
Action begins in cinemas from 30th Aug!#Prabhas @ShraddhaKapoor @sujeethsign @arunvijayno1 @UV_Creations @itsBhushanKumar @TSeries #30AugWithSaaho pic.twitter.com/PGPxaone89
प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी आहे त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अन्य कोणत्या चित्रपटाशी क्लॅश होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.
दरम्यान, चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटातील एक महत्त्वाची भूमिका साकारत असलेल्या अरुण विजयने , विश्वांक या त्याच्या चित्रपटातील भूमिकेचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आणले.
Here’s #Vishwank from #Saaho ..
— ArunVijay (@arunvijayno1) August 6, 2019
I’m sure you will love the character as much as I loved playing it!! 💪 #SaahoFromAug30th pic.twitter.com/X5qLJSHOdL
Here’s #Vishwank from #Saaho ..
— ArunVijay (@arunvijayno1) August 6, 2019
I’m sure you will love the character as much as I loved playing it!! 💪 #SaahoFromAug30th pic.twitter.com/X5qLJSHOdL