घरात बकरे कापण्यास मनाई : उच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बकरी ईदच्या निमित्ताने राहत्या घरात बकरे कापण्यास मनाई करण्याचा आदेश दिला आहे. जीव मैत्री ट्रस्ट व विनियोग परिवार ट्रस्ट या गैरशासकीय संस्थांनी दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिनांक ३ ऑगस्ट २०१९ रोजी हा आदेश संकेतस्थळावर टाकला आहे.

 

मुंबई महापालिकेने बकरी ईद च्या वेळेस होणाऱ्या पशुहत्येच्या संदर्भात एक धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने सदरची याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणी अद्याप सुरू असून हा अंतिम निर्णय नाही. उच्च न्यायालयाने, शहरातील मोक्याच्या ठिकाणी नाकेबंदी असावी, प्राणी वाहतूक करणाऱ्या वाहनांची चौकशी केली जावी. वाहनांची यादीही केली गेली पाहिजे, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. शहरातील प्रमुख ठिकाणांवर निगराणी ठेवण्यात यावी. मुक्तमार्ग, पश्चिम द्रुतगती मार्गांचा उल्लेख संबंधित आदेशात करण्यात आला आहे. पेटा, अन्नमानके अधिनियम इत्यादी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.

 

याचिकाकर्त्यापैकी विनियोग परिवार ट्रस्ट या  संस्थेने यातायातच्या दृष्टीने प्राणी वाहून नेणाऱ्या वाहनातील जागा इत्यादी बाबींवर आक्षेप नोंदवला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या अनुषंगाने बकरी ईद साजरी करणाऱ्यांना आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

@@AUTHORINFO_V1@@