कोण आहेत जमयांग सेरिंग नामग्याल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |



 


नवी दिल्ली : 'गेली ७१ वर्षे लडाखवासीयांना दुर्लक्षित केले गेले. फक्त मोदी सरकारने आम्हाला स्वतंत्रपणे उभे राहायची संधी दिली.' असे सांगत संसदेमध्ये सर्व विरोधकांना धारेवर धरणारे लडाखमधील भाजपचे युवा खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहे. "फक्त राजकीय स्वार्थासाठी ७१ वर्षांपासून लडाखला विकासापासून दूर ठेवले गेले," अशी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

 

 
 

कोण आहेत खासदार जमयांग सेरिंग नामग्याल ?

 

- जमयांग हे भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार आहेत.

 

- जमयांग यांचा जन्म ४ ऑगस्ट, १९८५ रोजी लेहमधील माथो या गावात झाला.

 

- त्यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बौद्ध स्टडीज, लेहमधून १२ वी केली. त्यानंतर त्यांनी जम्मू विद्यापीठामधून पदवी प्राप्त करून आपला मोर्चा समाजकार्याकडे वळवला.

 

 
 

- राजकारणामध्ये येण्याआधी त्यांनी 'ऑल लडाख स्टुडंट असोसिएशन, जम्मू' मध्ये २०११-१२ मध्ये अध्यक्षपद भूषवले.

 

- भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी लडाखचे माजी खासदार थुपस्तान छेवांग यांचे खासगी सचिव म्हणून काम केले.

 

- २०१५ मध्ये त्यांनी मार्टसेलॅंग मतदार संघातून लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल, लेहमधून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि  नगरसेवकपद मिळवले.

 

- मुख्य कार्यकारी नगरसेवक पदावरून दोरजेय मोटप यांनी राजीनामा दिल्यानंतर जमयांग सेरिंग नामग्याल यांची लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल, लेहच्या ८ व्या मुख्य कार्यकारी नगरसेवकपदी निवड करण्यात आली.

 

- त्यानंतर मार्च २०१९ मध्ये त्यांना भाजपकडून लडाख लोकसभा मतदारसंघाकडून उमेदवारी दिली. १७ व्या लोकसभेमध्ये निवडून येत. ते सध्या संसदेत लडाखचे प्रतिनिधित्व करत आहेत. १७ व्या लोकसभेसाठी जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या ३ सदस्यांपैकी ते एक आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@