जम्मू-काश्मीरसाठी प्राणाची आहुती देण्यास तयार - अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : वेळ आली तर जम्मू-काश्मीरसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची सिंहगर्जना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत केली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणारे विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आज हे विधेयक लोकसभेत मांडले. यावेळी काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम असलेले शाह यांनी विरोधकांना खडेबोल सुनावत जम्मू-काश्मीरसाठी आणि पाकव्याप्त काश्मीरसाठी आपण आपल्या प्राणाची आहुती देण्याची गर्जना केली.

 

लोकसभेमध्ये विधेयक सादर करण्यापूर्वीच काँग्रेससह विरोधकांनी गोंधळ घालत चर्चेस खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाह यांनी विरोधकांना रोकठोक उत्तर देत चर्चेसाठीचे आव्हान दिले. मात्र विरोधकांचा गोंधळ कमी होत नव्हता. अखेर शाह यांनी खास आपल्या भाषेत काँग्रेसला खडेबोल सुनावले. यानंतर काँग्रेसचा सूर मावळला व शाह यांनी कलम ३७० रद्द करणारे विधेयक लोकसभेसमोर मांडले. दरम्यान, काँग्रेसच्या भूमिकेमुळे पक्षातील नेत्यांसह देशभरातील जनतेमध्ये रोष दिसून येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@