सुषमा स्वराज यांचा अल्पपरिचय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


दि. १४ फेब्रुवारी १९५३ रोजी सुषमा स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा) यांचा जन्म हरियाणामधील अंबाला कँट येथे झाला. शर्मा कुटुंबीय मूळचे तसे लाहोरचे. पण, नंतर ते लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले. त्यांचे वडील हरदेव शर्माही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते. सुषमा यांनी सनातन धर्म महाविद्यालयातून संस्कृत आणि राज्यशास्त्रामध्ये पदवी संपादित केली. पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला. एवढेच नाही तर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सलग तीनवेळा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. १९७३ मध्ये स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले.



सुषमा स्वराज यांची राजकीय कारकीर्द
 

- १९७० मध्ये अभाविपमधून राजकारणात प्रवेश


- त्या १९७७ मध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.

- दि. १३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ असा अल्पकाळ त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

- संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून त्या तीन वेळा निवडून आल्या.

- १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून, तर २००९ साली मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या.

- २००० - २००९ या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या.

- स्वराज यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री आदी मंत्रिपदे भूषविली

- डिसेंबर २००९ ते मे २०१४ हा काळ त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून चांगलाच गाजवला.

- २०१४ च्या निवडणुकीत विदिशा मतदारसंघातून चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने सुषमा स्वराज विजयी झाल्या.

- दि. २६ मे २०१४ रोजी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.

- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यात घेत लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
@@AUTHORINFO_V1@@