माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 

झुंजार पर्वाचा अस्त...

 

 
 

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशीरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या.

 

गेल्या काही दिवसांपासून त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळेच त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. मंगळवारी सायंकाळी स्वराज यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. स्वराज यांच्यावर ‘एम्स’ रुग्णालयात रात्री उशीरापर्यंत उपचार सुरु होते. स्वराज यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी ‘एम्स’ रुग्णालयात धाव घेतली. मात्र थोड्या वेळातच उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांवर झळकले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी व डॉ. हर्षवर्धन यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते यावेळी तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले होते.

 
 

सुषमा स्वराज यांनी निधनाच्या अवघ्या काही तासांपूर्वीच, कलम ३७० हटविण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त करतानामी माझ्या संपूर्ण आयुष्यात या दिवसाची वाट पाहत होते,’ असे भावूक ट्विट केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले. सुषमा स्वराज यांच्यासारख्या एका झुंजार पर्वाचा असा अनपेक्षित व अचानक अस्त झाल्यामुळे संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांनी स्वराज यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@