संघाने व राष्ट्र सेविका समितीने केले केंद्र सरकारचे अभिनंदन...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : कलम ३७० व कलम ३५ अ रद्द करून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समर्थन करत स्वागत केले. तसेच सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे संघाने अभिनंदनही केले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एकत्रित ट्विट करत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.

 

काश्मीरसहित संपर्ण देशाच्या विकासासाठी कलम ३७० व कलम ३५ अ रद्द करणे आवश्यक होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन. सर्वांनी स्वतःचा स्वार्थ आणि राजकीय मतभेद बाजूला ठेऊन या निर्णयाचे स्वागत व समर्थन करायला हवे, असे डॉ. मोहनजी भागवत व भय्याजी जोशी यांनी ट्विट करून सांगितले.

 

राष्ट्र सेविका समितीनेदेखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. समितीच्या प्रमुख संचालिका शांता कुमारी व प्रमुख कार्यवाहिका ए सीता यांनी सरकारचे अभिनंदन केले. राष्ट्रहित लक्षात घेऊन सर्व भारतीय या निर्णयाचे स्वागत करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@