जो कहा, वो कर के दिखाया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : ५ ऑगस्ट हा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. बरेच वर्ष चाललेल्या काश्मीर प्रश्नावर मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे बहुचर्चित कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ३७० हटवण्यासाठीचे विधेयक मांडले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला वसा हा अखेर पूर्ण केला. त्यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

  

पंतप्रधानांनी जे सांगितले, ते करून दाखवले. याची प्रचिती त्यांचा जुना फोटो पाहून आपल्याला येतेच. हा फोटो कृष्णधवल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपसाठी आंदोलन करत असतानाचा हा फोटो आहे. कलम ३७० रद्द करण्यासाठी अर्थात हटवण्याच्या मागणीसाठीच मोदी आंदोलनाला बसले होते. त्याचवेळचा हा फोटो आहे. कलम ३७० हटवा, अशी मागणी करणारा फलक त्यांच्या मागे लागला आहे. या फलकावर लाल रंगाचे वर्तुळ काढण्यात आले आहे आणि हा फोटो व्हायरल होतो आहे.

@@AUTHORINFO_V1@@