काँग्रेसला झटका ; पक्षाच्या भूमिकेवरून पक्षप्रतोदचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |




नवी दिल्ली : काँग्रेस राज्यसभेतील पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० विषयी पक्षाने व्हीप जारी केल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. केंद्र सरकारच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाला हा पहिला मोठा झटका बसला आहे.

 

कलम ३७० हटवण्याच्या विधेयकावर आज राज्यसभेत मतदान घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हीप जारी केला. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर नाराज असलेल्या कलिता यांनी पक्षनेतृत्वावर तोंडसुख घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्याची संपूर्ण देशाची मागणी असताना, काँग्रेस पक्षाचा विरोध समजण्या पलीकडचा आहे. काँग्रेस पक्ष आत्महत्या करायला निघाला असल्याचे कलिता म्हणाले.

 

दरम्यान, सोशल मीडियामधूनही काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेस ही आधुनिक भारतातील मुस्लिम लीग असल्याचे काही ट्विटर वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेनंतर आगामी काळात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसल्यास आश्चर्य वाटायला नको.

@@AUTHORINFO_V1@@