ऐतिहासिक ; कलम ३७० रद्द करण्याची केंद्र सरकारची घोषणा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |

 
 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे बहुचर्चित असलेले कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत याबाबत घोषणा करत ३७० हटवण्यासाठीचे विधेयक मांडले. यानंतर शहा यांनी कलम ३७० रद्द करण्याविषयी राज्यसभेत चर्चा व्हावी यासाठी सदनातील सर्व सदस्यांना आवाहन केले. मात्र विरोधकांनी गदारोळ करत शहांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

 

काश्मीर प्रश्नावर आम्ही चार विधेयके मांडणार असल्याचे शाह यावेळी म्हणाले. तसेच राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने लवकरात लवकर कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

चर्चेस तयार, चर्चा करावी

 

विरोधकांनी घातलेल्या गदारोळानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना खणखणीत उत्तर दिले. काँग्रेस आणि विरोधकांनी चर्चा करावी आम्ही चर्चेस तयार असल्याचे शाह यांनी सांगितले. कलम ३७० हटवण्यास आता उशीर करून चालणार नाही. यासाठी काँग्रेस आणि विरोधकांनी गोंधळ न घालता चर्चा करावी, मी सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असल्याचे शहांनी विरोधकांना सुनावले.

 
 

जम्मू-काश्मीर व लडाख दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश

 

३७० हटवून जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले. आतापर्यंत लडाख हा जम्मू-काश्मीरचाच भाग मानला जात होता. मात्र नवीन विधेयकानुसार लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच जम्मू-काश्मिरात विधानसभेचे अस्तित्व कायम राहणार असल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.

 

काय आहे कलम ३७०

 

१९४७ साली तत्कालीन केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी कलम ३७० लागू करण्याचा निर्णय घेतला होता. कलम ३७० मुळेच जम्मू-काश्मीरवर १९७६ चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेरचा व्यक्ती येथे जमीन खरेदी करू शकत नाही. याशिवाय भारतातील इतर राज्यांमध्ये लागू होणारे कायदे येथे लागू होत नाहीत.

@@AUTHORINFO_V1@@