पीडीपीच्या खासदारांचा 'माज'; भर संसदेत संविधान फाडण्याचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |



 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे बहुचर्चित असलेले कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत याबाबत घोषणा करत ३७० हटवण्यासाठीचे विधेयक मांडले. विरोधकांकडून याचा विरोध झाला. एवढेच नव्हे तर २ पीडीपी नेत्यांनी संसदेत भारताचे संविधान फाडण्याचा प्रयत्न केला.

 

गृहमंत्री अमित शहा यांच्या यांनी कलम ३७० रद्द करण्याविषयी राज्यसभेत चर्चा व्हावी यासाठी सदनातील सर्व सदस्यांना आवाहन केले. मात्र विरोधकांनी गदारोळ करत शहांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. २ पीडीपीचे नेते नजीर अहमद लवे आणि एमएम फैयाज यांनी विरोध करताना संसदेत संविधान फाडण्याचा प्रयत्न केला. खासदार फैयाज एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्वतःचे कपडेदेखील फाडले. त्यानंतर या खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@