
'साहो' चित्रपटामधील प्रभास चा लूक आपण पहिला असेलच आता आज चित्रपटात आणखी एक महत्वाची भूमिका असलेल्या निल नितीन मुकेशच्या डॅशिंग लूकचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. २०१७ सालीच निल नितीन मुकेशने 'साहो' मधील आपल्या सहभागाविषयी प्रेक्षकांना अंदाज दिला होता. त्यानुसार आज चित्रपटातील 'जय' च्या भूमिकेची अधिकृत घोषणा त्याने केली आहे.
Here is introducing you to #JAI from India’s Biggest Action Bonanza of 2019 SAAHO #Saaho releases worldwide on 30th August! #30AugWithSaaho #Prabhas @ShraddhaKapoor @sujeethsign @arunvijayno1 @UV_Creations @itsBhushanKumar @TSeries pic.twitter.com/LKKi6uBckg
— Neil Nitin Mukesh (@NeilNMukesh) August 5, 2019
सुजीथ दिग्दर्शित 'साहो' हा चित्रपट २०१९ मधील बिग बजेट चित्रपट असून बिगेस्ट ऍक्शन थ्रिलर असल्याचे देखील निल नितीन मुकेशने आपला चित्रपटामधील लूक प्रेक्षकांसमोर आणताना म्हटले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांच्या समवेत एका निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.
बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर प्रभासचा 'साहो' हा पहिला चित्रपट आहे. त्याचबरोर या चित्रपटातून श्रद्धा कपूर तामिळ चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक औत्सुक्याचे बाब असेल. येत्या ३० ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.