
सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'छिछोर' या आगामी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज प्रदर्शित झाला. 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या ट्रेलरविषयी बोलताना, या ट्रेलरमध्ये मैत्रीचे नाते खूप छान दाखवण्यात आले असून फ्रेंडशिप डे च्या दरम्यान ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे त्याचा विशेष प्रभाव पडल्याचे म्हटले.
Simple. Effective. #Chhichhore trailer highlights the spirit of friendship wonderfully [well-timed on #FriendshipDay]... Also, here's the new release date: 6 Sept 2019... #ChhichhoreTrailer: https://t.co/ehGKHBpbQn
— taran adarsh (@taran_adarsh) August 4, 2019
श्रद्धा कपूरचा 'साहो' आणि 'छिछोर' यांची प्रदर्शनाची तारीख एकाच असल्याने तसेच स्पर्धेच्या दृष्टीने विचार करून चित्रपटकर्त्यांनी 'छिछोर' ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून आता हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आधी हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आजच्या या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.