'AB आणि CD' चे चित्रीकरण पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |


 


बॉलिवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आगामी मराठी चित्रपट म्हणून बहुचर्चित असलेल्या
'AB आणि CD' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. अभिनेत्री सायली संजीव हिने याविषयी आपल्या सोशल मीडियावरून प्रेक्षकांना माहिती दिली. सायली संजीव बरोबरच या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तसेच 'तुला पाहते रे' या मालिकेमुळे चर्चेत असलेले सुबोध भावे, अक्षय टांकसाळे आणि लोकेश गुप्ते हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

मिलिंद लेले दिग्दर्शित 'AB आणि CD' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे महिन्यात सुरुवात झाली होती आणि अखेर एवढ्या दिवसांच्या कष्टानंतर चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपट चंद्रकांत देशपांडे आणि अमिताभ बच्चन म्हणजेच 'AB आणि CD' यांच्यावरील सत्यकथेवर आधारित आहे.

सायली संजीव सध्या यु-टर्न या वेब सीरिजसाठी काम करत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन २५ वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटात काम करण्यात असल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकतेचे वातावरण आहे.

@@AUTHORINFO_V1@@