काश्मीरमध्ये अतिरिक्त आठ हजार जवान रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने लष्कर आणि हवाई दलाला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आणखी आठ हजार जवानांना काश्मीरमध्ये रवाना करण्यात आले आहे.

 

उत्तर प्रदेश, ओडिशा, आसामसह देशातील अन्य भागांतून निमलष्करी दलाला हवाई मार्गाने काश्मीरमध्ये पाठविण्यात येत आहे. इंडियन एअर फोर्सच्या सी-१७ या विमानातून जवानांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहे. मागील आठवड्यात प्रथम १० हजार व त्यानंतर २८ हजार निमलष्करी दलाच्या जवानांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@