घराणेशाहीपासून दूर राहा : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपाच्या खासदारांना संसदीय आचरणासोबत कौटुंबिक आयुष्य कसे जगावे याचे धडे दिले. खासदारांनी मतदारसंघातील कुटुंबाकडे लक्ष देतानाच, स्वतःच्या घराकडेही लक्ष द्यावे. मात्र, घराणेशाहीपासून दूर राहावे, असा सल्ला त्यांनी भाजपा खासदारांच्या द्विदिवसीय अभ्यासवर्गाच्या समारोपावेळी दिला. भाजपा खासदारांनी नकारात्मक आणि हीन भावनेतून बाहेर पडत उत्साही व्हावे. पूर्ण करणे शक्य असलेली आश्वासनेच जनतेला द्या. मोठ्या प्रमाणावर लोकांना जोडा, असे त्यांनी खासदारांचा आत्मविश्वास वाढवताना सांगितले.

 

खासदारांनी काय करावे, त्यांचे संसदेतील आचरण कसे असावे, याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. मतदारसंघातील नागरिकही कुटुंबाप्रमाणेच असतात. त्यांच्याकडे लक्ष देताना स्वतःच्या घराकडेही लक्ष द्या. पण, घराणेशाहीपासून दूर राहा, असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देताना सांगितले, आजवर कुणीही मला कलंकित करू शकला नाही, अन्यथा मी येथे तुमच्यासमोर उपस्थित राहू शकलो नसतो. मुख्यमंत्रिपदाचा आणि पंतप्रधानपदाचा कार्यकाळ एकत्र केल्यास, देशातील कोणत्याही राजकीय नेत्याच्या तुलनेत जास्त काळ आपण या दोन्ही पदांवर काम केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित खासदारांना केले. सर्व खासदारांनी तळागाळातील कार्यकर्त्याप्रमाणे काम करावे. त्यांच्यामध्ये अहंकाराची भावना यायला नको. ज्या बूथमध्ये किंवा मतदारसंघात पराभव झाला, तिथे विजय मिळवण्यासाठी आतापासून तयारीला लागा, असेही त्यांनी खासदारांना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@