सलग दुसऱ्यादिवशी मुंबईत पावसाचे थैमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2019
Total Views |




वसई, ठाण्यात शेकडो नागरिक अडकले

 
 

मुंबई : रविवारच्या दिवशी मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची दाणादाण झाली. मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल वाहतूक, तसेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर बसला. गेले कित्येक तास मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक ठप्प होती तसेच, पश्चिम रेल्वे आणि हार्बरवरही याचा चांगलाच फटका बसला. मुंबई- पुणे तसेच मुंबई- नाशिक या दोन्ही मार्गावरच्या अनेक एक्सप्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्या सुरक्षित ठिकाणी थांबण्यात आल्या.

 

ट्रकवरचे पाणी ओसरेना, लोकल काही चालेना...

 

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी मुंबई लोकल सेवा ही या रविवारी पूर्णपणे ठप्प पडली होती. शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सायन-कुर्ला परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य तसेच हार्बर लाईन पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तसेच कसारा ते सीएसटी आणि कर्जत ते सीएसटी या देखील काहीकाळ बंद करण्यात आल्या होत्या.

 

राज्यात पावसाचे रौद्ररूप ; अनेक नद्यांना पूर

 

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात दाणादाण उडाली आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, खडवली, कल्याण, रत्नागिरीतील खेड, विदर्भात गडचिरोली, नाशिक आदी भागात नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, खडवलीत तर अनेक जण पुरात अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून खडवलीतील २० जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@