पाकिस्तानी ध्वज फडकविणे एमएसएफला महागात, ३० जणांवर गुन्हे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019
Total Views |



केरळ:
केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात पेरंब्रा पोलिसांनी मुस्लिम विद्यार्थी आघाडीच्या (एमएसएफ) ३० विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पेरंब्रा सिल्व्हर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी ध्वज फडकावल्याचा आरोप आहे. ही घटना घडली. कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडली. यामध्ये ३० हून अधिक विद्यार्थ्यांवर कलम १४३ ,१४७, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.




गुरुवारी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान पाकिस्तानी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सध्या आयपीसीच्या कलम १३३, १७७, १५३ आणि १४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी तपास सुरू आहे. परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की हाच एमएसएफचा ध्वज आहे जो पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासारखा दिसत आहे. महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ए. के. थरुवाय म्हणाले की, एमएसएफचा ध्वज पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासारखा दिसत होता. सुट्टीच्या दिवशी ही मिरवणूक काढण्यात आली असून सोमवारी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 

@@AUTHORINFO_V1@@