एस.एम.मुश्रीफांचा पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : पाकिस्तानला मदत करण्यासाठी लिहिलेल्या दोन पुस्तकांवरून लीगल राईट्स ऑब्सर्व्हेटरीने शनिवारी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे प्रत्यक्ष लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारींशिवाय मुश्रीफ आणि अन्य ३ जणांविरोधात प्रधानमंत्री, केंद्रीय ग्रुहमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यासह देशाच्या अनेक गुप्तचर आणि वैधानिक संस्थांसह एकुण ३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

 
 
 

भारतातील लोकांकडुन भारतविरोधी आणि पाकिस्तानला मदत होईल असे पुरावे तयार करून घेणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कमांड - ११ कडुन पैसे घेऊन 'हु किल्ड करकरे' आणि 'मुस्लिम्स हँगड' ही पुस्तके एस.एम.मुश्रीफ यांनी लिहिले असल्याचा दाट संशय आहे. मुश्रीफ यांच्याशिवाय निवृत्त पोलीस आणि सनदी अधिकारी गायकवाड, आंबेडकर आणि निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे यांचीही एन.आय.ए. चौकशी करुन या चारही जणांचे निवृत्तीवेतन आणि अन्य सरकारी आर्थिक लाभ चौकशी संपेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी अशी मागणी एल.आर.ओ. ने केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@