फुटीरतावाद्यांच्या नाकावर टिच्चून काश्मिरी तरुणांचा भारतीय सैन्याकडे ओढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019
Total Views |



श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागातून ५७५ तरुण भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. शनिवारी श्रीनगरमधील पासिंग आउट परेडमध्ये जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीसाठी नवीन भरती करण्यात आल्या. नव्याने भरती झालेल्यांनी तरुणांनी सांगितले की ते मातृभूमीच्या सेवेसाठी तयार आहेत आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करण्यापासून कधीही परावृत्त होणार नाहीत. भारतीय सैन्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. नव्याने भरती झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांसाठी देखील ही अभिमानस्पद गोष्ट असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.


लेफ्टनंट जनरल अश्वानी कुमार यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या बदलत्या चेहऱ्याचे हे संकेत आहेत. यापुढेही या भागात अनेक भरती मोहीम राबवल्या जातील. भारतीय लष्कर ज्यांना जीवनात पुढे जायचे आहे अशा सर्वांच्या पाठीशी उभे आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोऱ्याना रोखण्यासाठी १९४७ मध्ये जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री अस्तित्वात आली. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्याने या भागाला असणारा विशेष दर्जा संपवल्यामुळे आता या भागात सैन्यभरती करण्यात आली. अश्वानी यांनी पुढे सांगितले,"हा भाग देशाचे महत्वपूर्ण सीमारेषा असल्याकारणाने देशाच्या इतर भागातून अनेक जवान काश्मीर घाटीत गेले आहेत. खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना दाखविणारे अनेक वृत्त समोर आले असले तरीही जम्मू-काश्मीर पोलिसांसह सरकारी अधिकाऱ्यानी व गृहमंत्रालयाने हे फेटाळून लावले आहेत. काही तुरळक घटनांव्यतिरिक्त हा प्रदेश शांततापूर्ण आहे. याभागात कोणतेही मोठे निदर्शने झाले नाहीत. लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यासारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी मात्र या प्रदेशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक पत्र पाठवून लोकांना दुकाने उघडण्यास किंवा घराबाहेर जाण्यापासून भडकावले.

@@AUTHORINFO_V1@@