आता राहुल गांधींची 'या' कोर्टाची वारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019
Total Views |



मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली 'चौकीदार चोर है' ही घोषणा पुन्हा भोवण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ३ ओक्टॉबरला राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बाजावण्यात आले आहे.

 

मुंबईतील स्थानिक भाजप कार्यकर्ते महेश श्रीमल यांनी याचिका दाखल केली आहे. राजस्थान येथे पार पडलेल्या एका रॅलीदरम्यान 'गली गली मे शोर हे, चौकीदार चोर है!' अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ट्विट करत मोदी हे चोरांचे सरदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचे याचिकर्त्यांचे म्हणणे आहे.

@@AUTHORINFO_V1@@