बुद्धिबळ आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2019   
Total Views |



चिह्न निमित्त-निमित्त चिह्नया लेखमालेतील हा शेवटचा लेख. प्राचीन भारतीय समाजातील विद्वानांनी आपला अभ्यास, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमध्ये मांडला. प्रत्येक परिस्थितीचा वापर मूल्यवृद्धीसाठी केला. निसर्गाच्या वार्षिक बदलांना स्वीकारताना त्या बदलणाऱ्या निसर्गाचा वापर, कौटुंबिक आणि सामाजिक सण-समारंभ आणि आनंदनिर्मितीसाठी केला गेला. पंचतंत्रातील प्राणी-पक्षी-माणसे यांच्या गोष्टी असतील किंवा खगोलविज्ञानातील ग्रह-तारे-नक्षत्रे असतील, या सर्वांना विविध चिह्न आणि प्रतीकांच्या माध्यमातून अजरामर केले गेले. अगदी तशीच मात्र फार व्यापक अर्थ आणि संदर्भ असलेली प्राचीन भारतातील अन्य निर्मिती म्हणजे बुद्धिबळ, त्याचा पट आणि त्याच्या सोंगट्या...



आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून जगात सर्वमान्य असलेला
बुद्धिबळआणि चेसया संबोधनाने आज परिचित हा बुद्धीचा खेळ ज्याकाळात प्रगत झाला, त्यावेळी त्याची मांडणी आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती. आपल्या लेखात आज आपण याच्या मूळ भारतीय बांधणीतील चिह्ने आणि प्रतीकांचा परिचय करून घेणार आहोत. मूळ काळ्या आणि पांढऱ्या अशा आलटून पालटून तयार झालेल्या फक्त चार चौकोनांच्या एकत्र मांडणीतून बुद्धिबळाचा ६४ खणांचा हा पट तयार झाला आहे. (चित्र क्र. ३) याच चार चौकोनातूनच प्राचीन वास्तुपुरुष मंडलाची निर्मिती झाली आहे. प्रथम या वास्तुपुरुष मंडलाचा परिचय करून घेऊया.


चित्र क्र. २ वास्तुपुरुष मंडल

हे वास्तुपुरुष मंडलम्हणजे शिवदेवतेचे, सृष्टीच्या आदिनिर्मात्याचे प्रतीक आहे. हाच सृष्टीचा नियंता महादेव, काळाचा नियंत्रक आणि कर्ता आहे. आपल्या चतुर्भुज मुद्रेत हा सर्वशक्तिमान महादेव जसे या अगणित सृष्टीच्या काळाचे नियंत्रण करतो, अगदी तसेच तो या चार चौकोनातून आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील काळाचे नियंत्रणसुद्धा करत असतो. काळ्या आणि पांढऱ्या रंगांची अदलाबदल हे व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि अर्थात विश्वाच्या, सतत पुढे जाणाऱ्या काळाचे रूपक आणि प्रतीक आहे.


चित्र क्र. ३ काळे-पांढरे चार चौकोन

अंतरिक्ष आणि काळअर्थात 'Space and Time' या दोन वैश्विक वास्तवांचा संदर्भ आपल्या विद्वान पूर्वजांनी, या काळ्या-पांढऱ्या चार चौकोनांच्या चिह्नांत बंदिस्त करून चिरंतन केला आहे. स्वतः भोवती फिरतानाच सूर्य प्रदक्षिणा करणाऱ्या पृथ्वीवरून सातत्याने दिसणाऱ्या या अगणित खगोलाची अविरत चक्राकार गती आणि अमऱ्याद अंतरिक्ष, याचे सार्वभौमत्व या चार चौकोनात चिह्नांकित झाली आहे. प्रतीकशास्त्र संकेतानुसार समभुज चौकोन हे पृथ्वीचे म्हणजेच भूमीचे प्रतीक मानले गेले आहे. निसर्गातील सकाळ आणि रात्र हे कालचक्रानुरूप पृथ्वीवर नियमित होणारे दैनंदिन बदल आणि त्याची चक्राकार गती असा दुसरा संकेत या चार चौकोनातून प्रसारित होत असतो. विणलेल्या कापडासारखे याचे काळा आणि पांढरा रंग अनेक संदर्भ दृष्यांकित करतात अथवा दृष्टिआड करतात. या एकाच समभुज चौकोनात दोन चिह्नसंकेत प्रसारित होतात. अचल, कुठलाही बदल न होणारे अपरिवर्तनीय असे शिवतत्त्वअर्थात पुरुषतत्त्वया बरोबरच या चौकोनाची घनता म्हणजे शक्तीतत्त्वअर्थातच स्त्रीतत्त्वअसे हे दोन अलौकिक आणि लौकिक संकेत. काळा रंग, असूरशक्तीचे म्हणजेच हिंसक प्रवृत्तीचे, दु:ख आणि यातनांचे रूपक आहे. या दानवी, असूर प्रवृत्तीवर देवांनी म्हणजेच योग्य आणि न्यायी प्रवृत्तीने म्हणजेच पांढऱ्या चौकोनांनी केलेली मात असा अन्य संकेत या काळ्या-पांढऱ्या चौकोनातून दिला जातो. याच नेमक्या संकेतातून बुद्धिबळ हा खेळ स्पर्धात्मक असल्याचे स्पष्ट होते. मानवी मनातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीमधील निरंतर संघर्ष आणि स्पर्धा या ६४ घरांतून वास्तवाचे स्वरूप घेतो.


या पटावर मांडल्या जाणाऱ्या मोहरांना अनेक रूपकात सदर केले गेले. यातील राजाची मोहर मानवी आत्मा आणि चैतन्याचे प्रतीक मानली जाते आणि अन्य मोहरा मानवी अंतर्मन आणि निसर्गदत्त आंतरिक उर्जेची प्रतीके बनली. या प्रत्येक प्याद्याची पटावरची चाल भिन्न आहे आणि मानवी मन आणि बुद्धीच्या भिन्न प्रवृत्तींचे संकेत देते. दैव-प्राक्तन-विधिलिखित या निर्गुण-निराकार मानवी संकल्पना-धारणा आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा संघर्ष या पटावरील ६४ घरांतून व्यक्त होतो. एखादे प्यादे पटावरून हलवताना पुढे काय होणार आहे
, त्याची दूरदृष्टी आणि त्या परिणामांचे ज्ञान या क्षमतेमुळे विचार स्वातंत्र्याचा अनुभव प्राप्त होतो. एखाद्यावेळी निव्वळ तीव्र प्रेरणा, पटावरचे एखादे प्यादे हलवण्याची सूचना देते. मात्र, अशा निव्वळ तीव्र प्रेरणा प्रत्येकवेळी यशस्वी होतातच असे नाही याची प्रचीती या खेळातून मिळते.


चित्र क्र. ४ अष्टपद-अष्टापद-चतुरंग पट

अगदी सहाव्या-सातव्या शतकात गुप्तकालीन पुरातत्त्व इतिहासात चतुरंगया चौकोनी पटावर खेळण्याच्या बुद्धीच्या खेळाचा संदर्भ सापडतो. (चित्र क्र. ४) मात्र, यापूर्वी ख्रिस्तपूर्व पाचव्या ते पहिल्या शतकातील संस्कृत पुराणात अष्टपदआणि अष्टापदया संबोधनांनी परिचित या खेळाचा संदर्भ मिळतो. अष्टपदकिंवा अष्टापदम्हणजे समभुज चौकोनी आकारात, उभ्या आठ आणि आडव्या आठ अशा एकूण समान ६४ चौकोनांचा पट म्हणून याला अष्टपदअसे संबोधन वापरले गेले. सहाव्या-सातव्या शतकात गुप्तकालीन राजवटीमध्ये हाच ६४ खणांचा पट चतुरंगया संबोधनाने परिचित झाला. चित्र क्र. ४ मध्ये दिसत असल्याप्रमाणे चार रंगांच्या प्रत्येकी आठ सोंगट्यांचा वापर करून हा खेळ चारजणांमधे एक फासा वापरून खेळला जात असे. याच नावाने हा खेळ जगभर पोहोचला. मात्र, प्रदेशागणिक भाषेमध्ये चतुरंगया शब्दाचा अपभ्रंश होत गेला. पूर्व आणि मध्य आशियात हा खेळ चीत्तारीन,’ ‘चंद्रकी,’ ‘चतारा,’ ‘चाटोरआणि शादुराया नावांनी परिचित झाला. उत्तरेकडे चत्रंग,’ ‘शतरंज,’ ‘सुत्रेंज,’ ‘शाखआणि शाखमातया नावांनी ओळखला गेला. मूळ भारतीय संस्कृतीत यातील काळ्या आणि पांढऱ्या रंगाची प्यादी, खाली



चित्र क्र. ५ मधील सूचीतील चिह्नांच्या समोर उल्लेख केलेल्या नावाने परिचित होती. गुप्तकालीन सातव्या शतकात हा
चतुरंगखेळ पर्शियामध्ये पोहोचला आणि त्यावर अन्य संस्कार झाले. पर्शियावर मुस्लीम सत्ता स्थापन झाल्यानंतर हा खेळ इस्लामिक संस्कृतीत शतरंजया नावाने स्वीकारला गेला. या मुस्लीम देशांतील व्यापारी युरोपात जात असत त्यांच्यामार्फत हा खेळ युरोपात पोहोचला. नवव्या शतकात बगदादमध्ये राहाणाऱ्या अल मासुदी या अरब विद्वानाने या खेळाबद्दल सविस्तर लेखन आणि विश्लेषण केले आहे. मूळ भारतीय हिंदू संस्कृतीत हा खेळ प्रगत झाला याबरोबरच त्यातील चिह्नसंकेतांचा उल्लेख अल मासुदी याने त्याचा साहित्यात विस्ताराने केले आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार राजा बलहित याने आपल्या पदरी असलेल्या एका विद्वानाला एक बुद्धीचा खेळ विकसित करायला सांगितले होते. या खेळांत चंद्र-सूर्य आणि अन्य सहा तार्यांच्या चिह्नांचा समावेश समोरासमोरच्या आठ चौकोनांमध्ये केला गेला होता. हे आठ ग्रह आणि तारे आठ दिशांचे संकेत होते.



प्राचीन संस्कृत साहित्यातील अन्य उल्लेखानुसार
, या खेळाच्या निर्मात्याने राजाला पहिल्या चौकोनात धान्याचा एक दाणा ठेवायला सांगितला. पुढील प्रत्येक चौकोनात आधीच्या चौकोनातील दाण्याच्या दुप्पट धान्य ठेवावे, असा दुसरा नियम सांगितले. या गणितातून शेवटच्या ६४ चौकोनात ठेवले गेलेले धान्याचे दाणे १८, ४४६, ७४४, ९७३, ७०९, ५५१, ६६१ इतक्या संख्येचे झाले. २५ हजार, ९२० वर्षे हा 'Precession of Equinoxesया खगोलीय घटनेला लागणारा काळ आहे. २५ हजार, ९२० या संख्येचा पटावरील चौकोनांची एकूण ६४ ही संख्या लघुत्तम पूर्णांक आहे. तत्कालीन भारतीयांना खगोलाची अशी गणिते निश्चित माहिती होती. चतुष्कोनीआणि अष्टकोनीया प्रमाणात वर्तुळाकार प्रगत होणाऱ्या (४ द ४ द ४ = ८ द ८) होणाऱ्या खगोलीय घटनेचा आणि वास्तुपुरुष मंडलया दोन्हीचा संदर्भ या बुद्धिबळाच्या पटावरील ६४ चौकोनात प्राचीन भारतीय विद्वानांनी दिला आहे. 'Time and Space’ अर्थात अंतरिक्ष आणि काळया वैश्विक तरीही लौकिक सत्याचे संकेत देणारा हा बुद्धिबळाचा पट प्राचीन भारतीय गणिती, खगोलीय ज्ञानाचे आणि विलक्षण प्रगत चिह्नसंस्कृतीचे वैभवशाली उदाहरण आहे. चिह्ननिमित्त निमित्त चिह्नही लेखमाला या साठाव्या आणि शेवटच्या लेखाने संपन्न होते आहे. दै. मुंबई तरुण भारतआणि समस्त वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...!

@@AUTHORINFO_V1@@