ईडीची मिशन सफाई; आता काँग्रेसचे डी .के.शिवकुमार रडारवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |


नवी दिल्ली
: काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असणारे डी. के. शिवकुमार यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. शिवकुमार यांना शुक्रवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही ईडीने त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवकुमार यांच्यावर कर चोरी, बेहिशोबी मालमत्ता आणि हवालाच्या आधारे प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत.

यापूर्वी २०१७ मध्ये शिवकुमार यांच्या संपत्तीवर छापेमारी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या संपत्तीत अनिनियमितता असल्याचे आढळले होते. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. गुरुवारी कर्नाटक हायकोर्टाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत शिवकुमार यांनी ईडीचे समन्स फेटाळून लावण्याची मागणी केली होती.

मात्र शिवकुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळत आपल्या विरोधात मनी लाँड्रिंगचे कोणतेही प्रकरण दाखल नसल्याचे सांगितले. हे प्रकरण साधे आयकरासंबंधी असल्याचे आपण कोर्टाच्या लक्षात आणून दिले आहे. मला शुक्रवारी दुपारी १ वाजता दिल्लीला येण्यासाठी समन्स पाठवले आहेत. मी कायद्याचे पालन करेल. होणाऱ्या सर्व चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@