राष्ट्रवादीला आणखी एक धक्का : आता 'हे' पाचजण जाणार शिवसेनेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |


 



इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत असल्याकारणाने विरोधीपक्षातील बंड आणि सत्ताधारी पक्षांत इनकमिंग सुरूच आहेत. राज्यभरात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा सुरू आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार मोठ खिंडार पडले आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील गटनेत्यासह पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश होणार असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला आहे असून शिवसेनेचा गड आणखी मजबूत झाला आहे.

 

दरम्यान, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिकही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी पक्ष सोडत असल्याची घोषणा करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा गट लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्यासह रामराजे आणि उदयनराजे हेही भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@