नैवेद्य मोदकांचा, गूळ रुचियानाचा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |

श्रावण महिना सुरू झाल्यापासूनच मराठी माणसाला वेध लागतात ते भाद्रपदातील गणेशोत्सवाचे. मग त्यासाठी तयारी सुरू होते. मखर, रोषणाई किंवा काही ठिकाणी अगदी गणपतीच्या मूर्तीचा आकारही दरवर्षी वेगळा असतो. पण पहिल्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक हे ठरलेलेच.

 
 

मोदक करायचे म्हणजे प्रश्न येतो चवीचा. अशा वेळी साखर वापरायची का गूळ, हे ठरत नाही. पण फक्त गोडीच नव्हे, तर त्यासोबत खमंगपणाही लागतो आणि तो येतो फक्त गुळामुळेच. अर्थात, गूळ फक्त चवीसाठीच नाही तर त्याच्या आरोग्यदायी गुणांसाठीही पदार्थात वापरला पाहिजे. साखरेत उसाच्या रसातील फक्त सुक्रोजया एकाच घटकाचा समावेश असतो. सुक्रोजरक्तात झटकन विरघळतो आणि कमी वेळात जास्त ऊर्जा देतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर अपायकारक असते. मात्र, गुळात सुक्रोजसोबतच खनिजे , क्षार , लोह आणि तंतुमय पदार्थ असतात. त्यांचं पचन संथ गतीने होतं आणि त्यातून मिळणारी ऊर्जादेखील संथ गतीने उपलब्ध होते आणि दीर्घकाळ टिकते. त्यामुळे शरीरासाठी लाभदायक आहे. त्यामुळेच मधुमेह टाळण्यासाठी आणि मधुमेह असणाऱ्यांसाठीही गुळापासून लाभ मिळतो. पावसाळ्याच्या काळात साधारणपणे भूक कमी होते. याला आयुर्वेदाच्या भाषेत अग्निमांद्यम्हणतात. तसंच हवेत गारवाही आलेला असतो. त्यामुळे शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. गुळातून ही ऊर्जा तर मिळतेच शिवाय पचनदेखील सुधारतं.

 

हे सारे गुळाचे गुण माहीत असूनदेखील पदार्थांमध्ये गूळ वापरायचा ही गृहिणींना समस्या वाटते. कारण, साधारणपणे गूळ हा ढेपेच्या स्वरूपात मिळतो. ही ढेप सहजपणे हाताने फुटत नाही. ती चक्क हातोड्याने किंवा बत्त्याने फोडावी लागते. नाहीतर सुरीने , विळीवर चिरणे किंवा किसणे असे उपद्व्याप करावे लागतात. शिवाय हा चिरलेला किंवा फोडलेला गूळ पदार्थात घालण्यासाठी मोजणे हेदेखील कठीण काम असतं आणि त्यामुळेच गुळाऐवजी वापरायला सोप्या परंतु आरोग्यासाठी घातक साखरेचा पर्याय निवडला जातो.

 

गृहिणींची हीच समस्या ओळखून पितांबरीने रुचियाना गूळपावडर स्वरूपात उपलब्ध केला आहे. पावडर स्वरूपात असल्याने पदार्थात तो सहज विरघळतो आणि मोजमापही सुलभ होतं. शिवाय रुचियाना गूळहा पूर्णपणे रसायनविरहित आहे. रुचियाना गुळासाठी ऊस पिकवतानादेखील त्यात रासायनिक खत वापरलं जात नाही. त्यामुळे गणपतीच्या मोदकातच नव्हे, तर नैवेद्यासाठी करायच्या विविध पक्वान्नांमध्ये सहज वापरता येणारी रुचियाना गूळ पावडरआजच खरेदी करा.

 

 
@@AUTHORINFO_V1@@