पाकिस्तानमध्ये शीख मुलीचे जबरदस्ती धर्मांतरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |



परिवाराने केली पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी

 
 
 

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कट्टरपंथींने एका १९ वर्षीय शीख मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनाविरूद्ध तिच्याशी निकाह केल्याचाही आरोप तिच्या कुटूंबियांनी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे या प्रकरणी मदत मागण्यात आली आहे. या प्रकरणी केलेल्या तक्रारीनुसार, २७ ऑगस्ट रोजी काही हत्यारबंद लोकांनी त्यांच्या घरात घूसत बंदूकीचा धाक दाखवून मुलीला घरातून उचलून नेले. यापूर्वीही पाकिस्तानातून अल्पसंख्यांक हिंदूंच्या अपहरणाची प्रकरणे उघडकीस आली आहेत.


शिरोमणी अकाली दलाचे आमदार मानजिंदर सिंह यांनी गुरुवारी मुलगी हरवल्याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे कि,
"पाकिस्तानातील शीख बांधव इमरान खान यांच्याकडे मदत मागत आहेत. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेश मंत्री एस. जयशंकर यांनीही हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करावा. पाकिस्तानात शीख धर्म संकटात आहे, संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उपस्थित व्हायला हवा.", अशी मागणीही त्यांनी केली आहे.




 

मुलीच्या भावाने आपली कैफीयत मांडताना म्हटले कि, "माझ्या बहिणीला धाक दाखवून जबरदस्तीने इस्लाम कबुल करून घेतला आहे. इस्लाम कबुल न केल्यास तुझ्या वडिलांची हत्या केली जाईल, अशी धमकीही तिला देण्यात आली", असा आरोप भावाने केला आहे.

भारतीय विदेश मंत्रालयाने या प्रकरणी जाहीर केलेल्या वक्तव्यानुसार, "भारत प्रत्येकवेळी अशा अन्यायाविरोधात नेहमी आवाज उठवत आला आहे. अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या शोषण, हिंसा आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानने आपल्या देशातील सर्व अल्पसंख्यांक सुरक्षित राहतील, याची काळजी घ्यायला हवी." 

@@AUTHORINFO_V1@@