मोदींचे नाव घेताच पाकिस्तानी मंत्र्याला बसला विजेचा धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |




नवी दिल्ली : पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी गुरुवारी एका भाषणादरम्यान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची पोकळ धमकी दिली. शुक्रवारी भाषणादरम्यान शेख रशीद यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख करताच त्यांना माईकमधून करंट लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पत्रकार नाईला इनायतने ट्विट करत या घटनेचा व्हिडीओ शेअर केला. 



काही दिवसांपूर्वीच रशीद यांनी भाषणादरम्यान भारतासोबत युद्ध करण्याची भाषा केली होती. परंतु शुक्रवारी पाकिस्तानमध्ये 'झिरो आवर'च्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात भाषण करताना रशीद यांना जोरदार विजेचा झटका बसला. थोड्यावेळ गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या रशीद यांनी स्वतःला सावरत मोदींचा आक्रोश आम्ही सहन करणार नसल्याचे वक्तव्य केले. कलम ३७० रद्द केल्या पासूनच पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील नेते मोदींवर टीका करत आहेत. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून वारंवार नापाक कारवाया केल्या जात आहेत. शेख रशीद यांनी तर एका भाषणादरम्यान भारतासोबतच्या युध्दाची तारीखही सांगून टाकली. परंतु, पाकव्याप्त काश्मीरही आपल्या हातातून जातो कि काय या भीतीतूनच पाकिस्तान अशी बेताल वक्तव्य करत आहे.


 

@@AUTHORINFO_V1@@