करतारपूर कॉरिडोरवर होणार भारत-पाक अधिकाऱ्यांची बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या तणावपूर्ण स्थितीनंतर दोन्ही देशांचे अधिकारी करतारपूर गलियारा परियोजनेवर चर्चा करणार आहेत. पाकिस्तानी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांत शुक्रवारी सीमेवरील झिरो पॉईंट येथे बैठक होईल. पाकिस्तानने दिलेल्या प्रस्तावावर भारत सहमत असल्याचा दावा फैझल यांनी केला आहे. इमरान खान यांनी करतारपूर कॉरिडोर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे म्हटले होते. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त हे खुले केले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

 

पाकिस्तातील रावी नदीच्या तटावर स्थित करतारपूर गुरुद्वारा भारताच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक श्राईन यांच्या डेऱ्यापासून चार किमी दूर आहे. लाहोरपासून १२० किमी उत्तर पूर्वेकडे ही गुरुद्वारा आहे. गुरुनानक आपल्या आयुष्यातील शेवटची १८ वर्षे या ठिकाणी वास्तव्याला होते. कलम ३७० हटवल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलीकडून आणि रणनिती आखत आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या होत्या. त्यामुळे करतारपूर कॉरिडोर परियोजनेचाही प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नावर दोन्ही देशांकडून आज चर्चा केली जाणार आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@