भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआयची धडक कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2019
Total Views |


सीबीआयने एकाच दिवसात देशातील वेगवेगळ्या १५० ठिकाणी छापे टाकले.


नवी दिल्ली
: सीबीआयने शुक्रवारी भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई केली. सीबीआयने अचानक देशभरातील दीडशे ठिकाणी छापे टाकले. सीबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही मोहीम एक विशिष्ट हेतू समोर ठेवून चालवली गेली. ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना आणि छोट्या व्यावसायिकांना भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागत आहे अशा ठिकाणी हे छापे मारले गेले. ही मोहीम अनेक दिवस चालणार आहे. ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा संशय होता अशा अनेक ठिकाणाहून बरीच कागदपत्रे सापडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात दिलेल्या भाषणातील 'इज ऑफ लिव्हिंग' या घोषणेला या कारवाई सोबत जोडले जात आहे. याला 'इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ बिझिनेस' म्हटले गेले.


मिळालेल्या माहितीनुसार
, रेल्वे, कोळसा खाणी व कोळशाचे क्षेत्र, वैद्यकीय, आरोग्य सेवा संस्था, कस्टम विभाग, भारतीय खाद्य महामंडळ, ऊर्जा, महानगरपालिका, ईएसआयसी, परिवहन, सीपीडब्ल्यूडी, राज्य संचालक, अग्निशमन सेवा, उपनिबंधक कार्यालय, एनटीसीचे उद्योग विभाग, जीएसटी विभाग, राष्ट्रीय महामार्ग, बीएव्हीपी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या, मंत्री, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वित्तीय संस्था, सहाय्यक उपनिरीक्षक, शेती, शिपिंग कॉर्पोरेशन, बीएसएनएल, खाण आणि खनिज यासर्व विभागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@