महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2019
Total Views |



 


हौशी नाट्यसंस्था ३१ ऑगस्ट, २०१९ पर्यंत प्रवेशिका पाठवू शकतात


मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने येत्या १५ नोव्हेंबर, २०१९ पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धांसाठी हौशी नाट्यसंस्थांकडून ३१ ऑगस्ट, २०१९ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ५९ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर, २०१९ पासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्यस्पर्धांची अंतिम फेरी जानेवारी २०२० पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.


नाट्यस्पर्धेसाठी तीन  हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका ३१ ऑगस्ट, २०१९ पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

@@AUTHORINFO_V1@@