दबंग दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'छिछोर' हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्यात असून प्रदर्शनाला फक्त एक महिना बाकी आहे. या पार्श्वभूमीवर आज या चित्रपटाच्या मेकिंगमधील काही मजेदार क्षण टिपलेला एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या नावाप्रमाणे यामध्ये कोणती छिछोर वृत्ती समोर येते, हे आता लवकरच कळेल. परंतु, त्या आधी उद्या म्हणजेच ४ ऑगस्टला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
What a fun ride it has been :) Just one more day to go!!!#ChhichhoreTrailerOutTomorrow#SajidNadiadwala @ShraddhaKapoor @itsSSR @varunsharma90 @TahirRajBhasin@NaveenPolishety @tusharpandeyx #SaharshKumar @prateikbabbar @foxstarhindi@NGEMovies @WardaNadiadwala #Chhichhore pic.twitter.com/4OtbvJzW56
— Nitesh Tiwari (@niteshtiwari22) August 3, 2019
सध्या श्रद्धा कपूर 'साहो'मध्ये देखील झळकणार आहे आणि 'छिछोर'मध्येदेखील. आश्चर्य म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. मात्र, ही टक्कर टाळण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून आता नवीन माहितीनुसार चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येईल. दरम्यान, या निर्णयामुळे श्रद्धा कपूरनेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण, एकाच वेळी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले असते तर तिच्या मेहनतीला न्याय मिळणे अवघड झाले असते.