एनसीपीए सादर करीत आहे श्याम रंग: हिंदुस्थानी कंठ संगीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2019
Total Views |


 


जन्माष्टमी काही दिवसांवर आली असताना
, आम्ही कृष्णाची एक दंतकथा – 'द डार्क वन' साजरी करण्यासाठी 'श्याम रंग'च्या रूपाने संगीतामधून सादर करीत आहोत. भारतीय संगीत वृंदावनातील गोपालक असलेल्या कृष्णाच्या शृंगारिक कार्य-कलापांना वाहिलेले गद्य विषय आणि रचना यांनी व्यापलेले असून त्याच्या दैवी प्रेमाशी संबंधित भक्ती आणि तात्त्विक विचारांना वाहिलेले आहे. याच विषयावरील अनेक सुंदर गीतांनी हिंदी चित्रपट सृष्टीदेखील नटली आहे.

आर्या आंबेकर यांनी हिंदुस्थानी संगीताचे प्रशिक्षण प्राप्त केले आहे. मराठी 'सा रे ग म प'च्या च्या लिल चॅम्पस् मध्ये त्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. आज एक अष्टपैलू गायिका म्हणून अनेक प्रत्यक्ष संगीत मैफिली आणि टीव्ही कार्यक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत. शिवाय त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केले आहे. आर्या आंबेकर यांना मराठी चित्रपटात अभिनयाची संधीदेखील मिळाली आहे. विषयाला धरून असलेल्या या मैफिलीत आर्या आंबेकर पारंपारिक तसेच कृष्णाला वाहिलेल्या गीतांचा नजराणा सादर करणार आहेत.

 

कार्यक्रमाचा तपशील

कार्यक्रम : नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स (एनसीपीए) सादर करीत आहे श्याम रंग :

आर्या आंबेकर आणि ग्रुप यांचे हिंदुस्थानी कंठ संगीत

दिनांक आणि दिवस: शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

वेळ: सायंकाळी ६.३०

स्थळ: एक्स्पेरिमेंटल थिएटर, एनसीपीए

मूल्य: रुपये १८०/-, रुपये २००/-

@@AUTHORINFO_V1@@