विश्वकोशाच्या संकेतस्थळाचे आणि मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |



डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘विश्वकोश’ तरुणाईपर्यंत पोहोचावा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांचे आवाहन

 


मुंबई : मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळ आणि अ‍ॅपबरोबरच आता तो ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये साकारण्याचा आगामी काळात विचार करायला हवा. कारण, आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान वापरुन विश्वकोशतरुणाईपर्यंत पोहोचविता येईल,” असे आवाहन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळाच्या आणि अद्ययावत मोबाईल अ‍ॅपच्या लोकार्पण प्रसंगी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, विश्वकोश मंडळाचे सदस्य आणि ज्ञानमंडळांचे पालकत्व स्वीकारलेले ज्येष्ठ विज्ञान लेखक बाळ फोंडके आणि विश्वकोशाच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलणारे सदस्य, समन्वयकही उपस्थित होते.

 

आपल्या भाषणात बोलताना विनोद तावडे पुढे म्हणाले की, “बालभारतीच्या तसेच इतर शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तकांमध्ये विश्वकोशातील नोंदींचा संदर्भ, टीपा म्हणून कसा वापर करता येईल, त्याचा विचार करायला हवा. विश्वकोश मंडळाला बळकटी देणं हे शासन म्हणून आमचं कर्तव्य आहेच आणि तीच सर्वार्थाने मराठी भाषेची सेवा ठरेल,” असे म्हणत एकत्रित प्रयत्नांनी मराठी भाषा अधिकाधिक डिजिटल करण्याचे आवाहन तावडे यांनी उपस्थितांना केले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणाच्या तीन मुद्द्यांचा त्यांनी प्रारंभी उहापोह केला. ज्ञानवंतांचे नेटवर्किंग, संपर्क तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि वाचकाभिमुख काम या तीन मुद्द्यांभोवती विश्वकोशाचे कार्य आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर समूह सहभागावर भर असल्याचे सांगत, ‘विश्वकोशातील नोंदींमध्ये मूल्यवर्धनासाठी ऑडिओ-व्हिडिओचा समावेश केल्याचेही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.

 
मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लीक करा 
 

विश्वकोशआणि माहिती-तंत्रज्ञानातील बदल याविषयी बोलताना दिलीप करंबेळकर म्हणाले की, “माहिती-तंत्रज्ञानातील बदल हा मानसशास्त्रीय बदलदेखील आहे. त्यामुळे आता विश्वकोशाची मुळापासून पुनर्रचना करुन, प्रयत्न, कल्पकता आणि सहभागाच्या जोरावर विश्वकोश-३च्या दृष्टीने विचार केला पाहिजे.मराठी भाषेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “मराठी भाषा एकविसाव्या शतकात टिकवायची असेल, तर ती ज्ञानभाषाझाली पाहिजे आणि विश्वकोशाचे काम हे मराठी भाषेला ज्ञानभाषाम्हणून समृद्ध करण्याचे आहे.आगामी काळात मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश मंडळातर्फे संयुक्त उपक्रम हाती घेण्याबद्दल विचार करायची गरज असल्याचे ते म्हणाले. मराठी विश्वकोश सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. विश्वकोश मंडळाचे सदस्य आणि १२ ज्ञानमंडळांचे पालकत्व स्वीकारलेले प्रख्यात विज्ञान लेखक बाळ फोंडके यांनी ज्ञानसंस्कृतीचे महत्त्वया विषयावर आपले विचार मांडले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठीचा केवळ भावनिक अभिमान नाही, तर चिकित्सक अभिमान बाळगणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 
 

जर्मन ते इंग्रजीअसा ज्ञानभाषेचा झालेला प्रवास उलगडताना फोंडके यांनी भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी समीक्षा आणि प्रकाशनासाठी आईनस्टाईनला पाठविलेला इंग्रजीतील शोधनिबंध, आईनस्टाईन यांनी कसा बोस यांच्या नावानिशी जर्मन भाषेत प्रकाशित केला, त्याची रंजक माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. मराठीचा वापर आज खरचं ज्ञान मिळविण्यासाठी होतो का, असा परखड प्रश्न उपस्थित करत त्यांनी मराठी ज्ञानभाषा झाली, तर त्याला आपोआप अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल,” असे सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराविषयी बोलताना फोंडके म्हणाले की, “हल्ली मोबाईल हा शरीराचाच एक भाग, सहावं बोट किंवा तिसरा हात म्हणा तर, झाला आहे. या तंत्रज्ञानाचा आपल्या खासगी आयुष्य, नातेसंबंधांवर देखील प्रभाव जाणवतो. म्हणून आजचा संपूर्ण समाजच वाचक म्हणून उपलब्ध आहे. त्यासाठी बोलीभाषेत माहितीचे प्रसारण करणे आणि संस्कृतीचा ज्ञानाधिष्ठित प्रवास झाला पाहिजे. कारण, ज्ञान हेच भांडवल असून त्याद्वारे नवनवीन उद्योग सुरु होत आहेत. म्हणूनच ज्ञानसंस्कृतीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्यासाठीच विश्वकोशजनमानसात रुजला पाहिजे, त्याची लोकांना माहिती झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

 
 

या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीरंग भावे यांनी मराठी अभिमान गीत आणि विश्वकोश गीताचे सुरेल सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगतानंद भटकर यांनी केले. सादरीकरणाची जबाबदारी सचिन केळकर आणि विनय सामंत यांनी सांभाळली. विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाचे सदस्य, समन्वयक यांना यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विनोद तावडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामाकांत देवरे यांनी केले.

 

मराठी विश्वकोश आता नव्या रुपात

मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळाला आपण https://marathivishwakosh.org या लिंकवर भेट देऊ शकता. त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवरुन मराठी विश्वकोशचे अधिकृत अ‍ॅपही आपण डाऊनलोड करु शकता.

 
 
मराठी विश्वकोशच्या संकेतस्थळाची आणि अ‍ॅपची वैशिष्ट्ये
 
 
  • 44 विविध विषयांच्या ज्ञानमंडळांसह व्यापक नोंदी

  • विश्वासार्ह आणि तज्ज्ञांकडून संपादित माहिती

  • वर्णनासहित अधिकाधिक चित्रांचा वापर

  • विश्वकोशाची प्रथमावृत्ती आता डिजिटली उपलब्ध

  • खास बालकांसाठी कुमार विश्वकोश
 
  • साडे तीन लाख शब्दांचा मराठी, इंग्रजीतील अर्थांसह समग्र शब्दकोश

  • नोंदी शेअर करण्यासाठी सोशल मीडियाच्या लिंक्स

  • विषयनिहाय, लेखकनिहाय संपूर्ण सूची

  • र्‍हसव-दीर्घ विरहीत शोेधप्रणाली

 

@@AUTHORINFO_V1@@