आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राची लक्षणीय कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |



आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुरेला कांस्यपदक 


नवी दिल्ली
: रशियातील कझान शहरात आयोजित ४५ व्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने कांस्यपदक पटकाविले तर तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांनी उत्कृष्ट पदक पटकावली आहेत. या स्पर्धेत सहभागी ४८ सदस्य असणाऱ्या भारताच्या संघाने विविध कौशल्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करत १ सुवर्ण , १ रजत ,२ कांस्य पदक आणि १५ उत्कृष्ट पदकांची कमाई केली आहे. यात महाराष्ट्र कन्या श्वेता रतनपुरा हिने ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी मध्ये कांस्य पदक पटकाविले आहे. तुषार फडतरे याने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये तर ओंकार गुरव याने मोबाईल रोबोटिकमध्ये उत्कृष्ट पदक मिळविली आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदक जिंकून कामगिरीत लक्षणीय कामगिरी केली आहे.

 


आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत एकूण ६३ देशांतील १ हजार ३५० स्पर्धकांनी ५३ कौशल्य प्रकारात भाग घेतला. भारताने या स्पर्धेत १३वे स्थान मिळविले आहे. दरम्यान
, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडीसाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या वतीने दिल्लीत ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सर्वाधिक २३ पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता. या स्पर्धेत तुषार फडतरे याने सुवर्ण तर श्वेता रतनपुरा आणि ओंकार गुरव यांनी रजत पदकाची कमाई केली होती.

@@AUTHORINFO_V1@@