कोरेगाव-भीमा प्रकरणी आरोपीला उच्च न्यायालयाने फटकारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |


 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एल्गार परिषद कोरेगाव-भीमा प्रकरणात आरोपी वर्नोन गोन्साल्विस याला घरात बिस्वजित रॉय यांच्या 'वॉर अॅण्ड पीस इन जंगलमहाल' हे पुस्तक का ठेवले होते? असा जाब विचारला. याशिवाय अन्य आपत्तीजनक साहित्यही ठेवल्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी देताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने आरोपींना प्रश्न विचारले. यावेळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी देताना राज्याविरोधात सामग्री ठेवल्याचीही नोंद केली. 


'वॉर अॅण्ड पिस इन जंगलमहल' या पुस्तकासह अन्य सामग्रीबद्दलही विचारणा यावेळी करण्यात आली.  पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या घरात आढळलेल्या आक्षेपार्ह साहित्यामध्ये हे पुस्तक आढळले होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी जप्त केलेल्या सीडी आणि पुस्तकांचाही उल्लेख केला आहे. आरोपीच्या घरात कबीर कला मंचाद्वारे जारी करण्यात आलेली सीडी 'राज्य दमन विरोधी', मार्क्सिस्ट आर्काइव्स, जय भीमा कॉम्रेड, अंडरस्टैंडिंग माओइस्ट', ‘आरसीपी रिव्यू' आणि नॅशनल स्टडी सर्कलद्वारे जाहीर केलेल्या परिपत्रांच्या प्रतीही आढळल्या आहेत.

 

न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले, "पुराव्यातील 'राज्य दमन विरोधी' या सीडीच्या नावातच राज्यविरोधी उल्लेख आहे. 'वॉर अॅण्ड पीस इन जंगलमहाल' या पुस्तकात दुसऱ्या देशातील युद्धांचा उल्लेख आहे. तुमच्या घरात ही पुस्तके का ठेवली होती?, याचे स्पष्टीकरण न्यायालयाला द्यावे लागेल." न्यायामूर्तींनी आरोपींच्या जामिनावर सुनावणी करताना ही टिपण्णी केली.

पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, या परिषदेत ३१ डिसेंबर २०१७ रोजी केलेल्या भडकाऊ भाषणांमुळे या भागात जातीय हिंसाचार झाला होता. कोरेगाव-भीमाच्या लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात घडलेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अन्य जखमी झाले. या प्रकरणाचा कथित स्वरूपात नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू आहे. शोमा सेन, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा आदींना अटक करण्यात आली आहे.

वर्नोन गोन्साल्विस याचे वकील मिहीर देसाई यांनी आरोपीची बाजू मांडताना म्हटले, "पोलिसांनी गोन्साल्विस यांच्याविरोधातले पुरावे काही ई-मेल आणि दुसऱ्या व्यक्तींच्या कॉम्प्युटरमध्ये आढळलेल्या पुराव्यांद्वारे हे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. यातील ई-मेल गोन्साल्विस यांनी लिहिलेले नाही. यामुळे जामीन फेटाळू नये,", अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.


मीडियाचे 'ते' वृत्त वेदनादायी 

बिस्वजित रॉय यांच्या 'वॉर अॅण्ड पीस इन जंगलमहाल'  या पुस्तकाबद्दल विचारणा करण्यात आल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी लिओ टॉलस्टॉय यांच्या वॉर अॅण्ड पीस या पुस्तकाचा उल्लेख केलाच नव्हता असे वार्तांकन केले. टॉल्सटाय यांचे 'वॉर अँड पीस' हे पुस्तक साहित्य क्षेत्रातील अजरामर व सुप्रसिद्ध पुस्तक असल्याचे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये जे प्रसिद्ध झाले आहे, ते वेदनादायी आहे,' असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती सारंग कोतवाल यांनी स्पष्ट केले.  

@@AUTHORINFO_V1@@