फ्रान्स भारताशी नव्याने राफेल करार करण्यास इच्छुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |



राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर भारत-फ्रान्स यांच्यात बैठक

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या जी ७ परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांच्यात बैठक पार पडली. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक पार पडणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इमॅन्युअल बोन हे आज भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत.


फ्रान्स भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने नव्याने विकण्याच्या तयारीत आहे. याबरोबरच काही पाणबुड्या
, हेलिकॉफ्टर यांसारख्या युद्धसामग्रीबाबत करार करण्यास इच्छुक आहे. दोन वर्षांपूर्वी फ्रान्स आणि भारत या दोन देशांमध्ये राफेल विमानबाबतचा करार करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात ही राफेल विमाने आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि वायुसेना प्रमुख फ्रान्सला जाणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पहिले राफेल विमान भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@