काश्मीरवर तुमचा अधिकारच काय ? : राजनाथ सिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर वारंवार युद्धाची धमकी देणार्‍या पाकिस्तानला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी चांगलेच ठणकावले. “ज्या काश्मीरसाठी तुम्ही रडत आहात, ते काश्मीर तुमचे होतेच कधी,” असा सवाल त्यांनी यावेळी पाकिस्तानला विचारला. “जे तुमचे नव्हतेच मग त्यावर तुमचा हक्क कसा, ”अशीही विचारणा यावेळी त्यांनी केली.

लडाख येथे राजनाथ सिंह यांनी गुरुवारी एका विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानने अनधिकृतपणे कब्जा केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असून अत्याचारही वाढले आहेत. त्याकडे पाकिस्तानने लक्ष द्यायला हवे. १९९४मध्ये आमच्या देशाच्या संसदेने एक प्रस्ताव मंजूर केला असून त्यात भारताची स्थिती आणि भूमिका स्पष्ट केली आहे. स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे आम्ही तुमच्या अस्तित्वाचा सन्मान करतो. मात्र, काश्मीरवर तुमचा काही एक हक्क नाही,” अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले.






पुढे सिंग असेही म्हणाले, 'काश्मीर नेहमीच आपल्याबरोबर राहिला आहे आणि कायम राहील. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, पाकिस्तानाने असे प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. जर पाकिस्तान दहशतवादाचा वापर करून भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत असताना आपण पाकिस्तानशी चर्चा कशी करणार? '. राजनाथ सिंग यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते कि, पाकिस्तानसोबत आता चर्चा होईल ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच. याशिवाय इतर कोणत्याही मुद्दय़ावर नाही. जर पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारचा संवाद साधायचा असेल तर त्यांनी सहकार्य करावे आणि दहशतवादाला थारा देणे बंद करावे.
@@AUTHORINFO_V1@@