जय शाह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘द वायर’ला झापलं !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : डाव्या विचारांचा प्रसार करणारे द वायरहे पोर्टल अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांनी दाखल केलेल्या मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका 'द वायर'ने सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली. 'द वायर'वरील हा खटला गुजरातच्या ट्रायल कोर्टात चालवण्यात यावा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठापुढे केला. न्यायालयाने सिब्बल यांची मागणी मान्य केली, परंतु वारंवार होत असलेल्या पीत पत्रकारितेवरून 'द वायर'ला न्यायालयाने चांगलेच फटकारले.



अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने आजच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत
, पत्रकारांना किंवा लेखकांना लेख लिहिण्यासाठी आवश्यक वेळ न देता त्यांच्याकडून लेख प्रकाशित करून घेतले जातात. ही चिंताजनक बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले. जय शाह यांच्याविरोधात प्रकाशित झालेल्या लेखात जे काही लिहिले गेले आहे, ते आम्ही या प्रकरणाची सुनावणी करतेवेळी सिद्ध करू म्हणून आम्ही ही याचिका मागे घेत असल्याचे वायरने आपली बाजू मांडताना सांगितले.



द वायर'च्या पत्रकार रोहिणी सिंग यांनी जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर शाह यांनी द वायरवर १०० कोटींच्या मानहानीचा दावा केला होता. शाह यांच्या दाव्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने या पोर्टलला शाह यांच्याविषयी काहीही प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली होती. यावर शाह यांच्याविषयी लेख लिहिण्यापूर्वी बरेच संशोधन झाल्याचा दावा वायरने केला होता. मात्र, लेखकाला आर्थिक समज नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता 'द वायर' शाह यांच्यावरील आरोप सिद्ध करू शकते का ? आणि जर सिद्ध करू शकली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पुढील सुनावणीत स्पष्ट होईल.

@@AUTHORINFO_V1@@