राहुल गांधी म्हणतात, "काश्मीर प्रश्न हा देशांतर्गत मुद्दा"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |


पाकिस्तानच्या पत्रात उल्लेख आल्यानंतर दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात लिहिलेल्या एका पत्रात राहुल गांधी यांचे नाव आल्यानंतर आता राहुल गांधी यांनीही ट्विट करत या प्रकरणावर सफाई दिली आहे. काश्मीर प्रश्न हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाने दखल देण्याचे कारण नाही, काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.




 

 

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, "मी मोदी सरकारच्या कित्येक मुद्द्यांवर असहमत आहे. मात्र, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यासाठी पाकिस्तान किंवा जगातील कोणत्याही देशाने दखल देण्याची गरज नाही. जम्मू काश्मीरमधील हिंसा ही संपूर्णपणे पाकिस्तानने केलेले कारस्थान आहे. हे संपूर्ण जगाला माहिती आहे."


 

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या एका पत्रात काश्मीरमधील घाटीतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असताना राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हवाला दिला होता. या पत्रात मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचाही उल्लेख आहे. मेहबूबा यांनी काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर काळा दिवस घोषित केला होता. याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये सध्या या दोन्ही नेत्यांसह तब्बल २३०० नागरिकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@