'इम्रान खान बावळट' : हिना रब्बानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |




इस्लामबाद : कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानला कोणतीही मदत मिळत नाही. जी ७ परिषदेत झालेल्या पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीत काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. यामुळे पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीची दारे बंद झाली. इम्रान खान यांचे सरकार आल्यापासून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होत असल्याची टीका पाकिस्तानमधील विरोधी पक्ष करत आहेत. संसदेत पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी यांनी तर इम्रान खान बावळट असल्याची टीका भर संसदेत केली. रब्बानी यांच्या टीकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. हिना रब्बानी या पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या नेत्या आहेत.






हिना रब्बानी भाषणात म्हणतात
," इम्रान खान यांनी देशाला निराशेकडे नेले. तुम्ही बावळट असाल तर तुम्हाला प्रशिक्षणाची घेण्याची गरज आहे. आधी प्रशिक्षण घ्या. देशातील नागरिकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांचा मान ठेवा. त्यांनीही तुम्हाला मान द्यावा असे तुम्हाला नाही वाटत का ? असे प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच सुनावले. तसेच कलम ३७० रद्द झाल्यांनतर पाकिस्तानची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यात इम्रान खान अपयशी ठरल्याने इतर देशांकडून पाकिस्तानला पाठिंबा मिळत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

@@AUTHORINFO_V1@@