'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा बोलबाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019   
Total Views |



जगातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी सध्याच्या घडीला पाहता येतील अशा ठिकाणांची या वर्षातील दुसरी यादी 'टाइम'ने जाहीर केली. या यादीत भारतातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा भेट देण्यायोग्य ठिकाण तर 'सोहो हाऊस'चा समावेश राहण्यायोग्य ठिकाणांमध्ये करण्यात आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' उल्लेख करणारी 'टाइम' या प्रसिद्ध नियतकालिकात कव्हर स्टोरी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर जगभरात मोठे वादंग निर्माण झाले असले तरी यामुळे पाकिस्तानी लेखक आतिश तासीर याचा खरा चेहरा जगासमोर आला होता. तसेच 'टाइम' प्रकाशित होते, याची बऱ्याचशा भारतीयांना माहितीही झाली. याच नियतकालिकाने नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करत असल्याचा लेख प्रकाशित केला होता. यानंतरही 'टाइम' चांगलेच चर्चेत आले होते. 'टाइम'ने नुकतीच जगभरातील शंभर महत्त्वाच्या स्थानांची यादी जाहीर केली आहे. यामुळे पुन्हा एकदा 'टाइम' नियतकालिक चर्चेत आले, कारण या यादीत गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' व मुंबईच्या 'सोहो हाऊस'चा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. भारतासाठी ही अभिमानास्पद घटना असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

अमेरिकन 'टाइम' नियतकालिक विविध प्रकारच्या विविध याद्या प्रसिद्ध करत असते. या याद्यांमध्ये नाव असणे जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते. संग्रहालये, पर्यटनस्थळे, उद्याने, रेस्टॉरंट्स आणि हॉटेलबाबत अशाच प्रकारची एक यादी ते प्रसिद्ध करतात. जगातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी सध्याच्या घडीला पाहता येतील अशा ठिकाणांची या वर्षातील दुसरी यादी 'टाइम'ने जाहीर केली. या यादीत भारतातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा भेट देण्यायोग्य ठिकाण तर 'सोहो हाऊस'चा समावेश राहण्यायोग्य ठिकाणांमध्ये करण्यात आला आहे. जगातील १०० सर्वोत्कृष्ट ठिकाणांची यादी प्रसिद्ध करताना 'टाइम'ने संग्रहालये, पर्यटनस्थळे, उद्याने, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सचा विचार केला होता. यासाठी 'टाइम'च्या प्रतिनिधींनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने एक नामांकन यादी तयार केली होती. यामधून १०० जगप्रसिद्ध ठिकाणांची यादी 'टाइम'ने जाहीर केली. गुणवत्ता, कल्पकता, टिकावदारपणा, नाविन्य आणि प्रभाव या मुख्य घटकांच्या आधारे नामांकन करण्यात आलेल्या यादीतून ही १०० जगप्रसिद्ध स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये भेट देण्यायोग्य, राहण्यायोग्य व खाण्यापिण्या योग्य अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले होते. यात भेट देण्यायोग्य ठिकाणांमध्ये ३८ पर्यटनस्थळाचा व उद्यानांचा समावेश आहे. राहण्यायोग्य ठिकाणांमध्ये ४५ ठिकाणांचा समावेश आहे तर खाण्यापिण्यायोग्य ठिकाणांमध्ये १९ रेस्टॉरंट्सचा समावेश आहे.

 

भारतातील निवड झालेल्या ठिकाणांचा विचार करायचा झाल्यास, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा भव्य दिव्य असा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा आपला संकल्प पूर्ण करत १ नोव्हेंबर रोजी १८२ मीटर उंचीचा हा नेत्रदीपक पुतळा पर्यटकांसाठी खुला केला होता. यानंतर अनेक जागतिक विक्रम या पुतळ्याने नोंदवले असले तरी एका दिवसात ३४ हजार पर्यटकांनी भेट देण्याचा आणि 'टाइम'च्या प्रतिष्ठित यादीत नाव मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'नंतर 'टाइम'च्या या यादीत दुसरं नाव येते ते मुंबईतील 'सोहो हाऊस' या हॉटेलचे. ११ मजल्यांचे हे जगप्रसिद्ध हॉटेल मुंबईतील जुहू तारा रोडवर उभे आहे. या हॉटेलमध्ये अनेक जागतिक दर्जाच्या सुविधा असून ग्रंथालय, सिनेमागृहांचा यात समावेश आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे, या हॉटेलमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर अगोदर या हॉटेलची मेंबरशिप घ्यावी लागते. या दोन भारतीय ठिकाणांबरोबरच चाडमधील झाकोमा नॅशनल पार्क, पिटकेर्न आयलंड्समधील माता की ते रंगी आंतरराष्ट्रीय डार्क स्काई अभयारण्य, आइसलँडमधील जिओसिया जिओथर्मल सी बाथ्स, सेनेगलमधील काळ्या सभ्यतांचे संग्रहालय, कॅलिफोर्नियामधील हार्ट कॅसल, इटलीमधील टॅट्रो गल्ली, लाल समुद्र इजिप्तमधील माउंटन ट्रेल, तुर्कीमधील ट्रॉय संग्रहालय आणि भूतानमधील सहावे संवेदना यांचा समावेश आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा समावेश 'टाइम'च्या या यादीत झाल्याने जगात भारताची मान उंचावली असून यामुळे पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल.

@@AUTHORINFO_V1@@