हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या बहुचर्चित 'वाॅर' चित्रपटाचा फोर के क्वालिटीचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या व्हिडीओ क्वालिटीमुळे त्यांच्यातील युद्धामध्ये जान आली आहे असे म्हणावे लागेल. या ट्रेलरमध्ये वाणी कपूरच्या भूमिकेची देखील छोटी झलक पाहायला मिळाली. प्रत्येक युद्धाला दोन बाजू असतात. या युध्यमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूनी आहेत? टीम हृतिक का टीम टायगर? असा प्रश्न चित्रपटकर्त्यांनी प्रेक्षकांना विचारला आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यश राज फिल्म्स ची निर्मिती असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान हृतिकच्या सुपर ३० च्या जबरदस्त यशानंतर आणखी एक हिट चित्रपट घेऊन हृतिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत त्यामुळे त्यांच्या ऑन स्क्रीन भूमिका प्रेक्षकांना भावतात का हे पाहणे महत्वाचे असेल.