तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०१८ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019
Total Views |


 

 

पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीचा समावेश

 

नवी दिल्ली : तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०१८ जाहीर करण्यात आले असून, या पुरस्काराचे भू, जल, वायु साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते. वांगचूक शेर्पा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

पुरस्कार विजेत्यांमध्ये जलतरणपटू प्रभात राजू कोळी, गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, माणिकंदन के आणि हवाई साहसपटू रामेश्वर जांग्रा यांचा समावेश आहे.

 

राष्ट्रपती भवनात २९ ऑगस्ट २०१९ ला होणाऱ्या कार्यक्रमात इतर क्रीडा पुरस्कारांसह हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

@@AUTHORINFO_V1@@